PCMC : महापालिकेच्या उद्यानांमध्ये शोभिवंत झाडांऐवजी देशी झाडे लावा; ऑक्सिजन पार्क उभारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरांच्या (PCMC) नावातच पिंपरी, चिंच आणि वड या झाडांच्या नावाचा समावेश आहे. असे असताना महापालिकेच्या वतीने सध्यस्थितीत शहरातील विविध उद्यानांसह इतर ठिकाणी शोभिवंत झाडे लावण्यात येत आहेत. वास्तविकता या झाडांचा सुशोभीकरणा व्यतिरिक्त इतर कोणताच फायदा पक्षू, पक्षी यासह नागरिकांना होत नाही. त्यामुळे उद्यान विकसित करणे असो की वृक्षारोपनामध्ये वड, चिंच, आंबा यांसारख्या देशी वृक्षांचे रोपण करावे. ऑक्सिजन पार्कची निर्मिती करावी, अशी आगृही मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभाेर यांनी केली आहे.

याबाबत काळभाेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची लहान-माेठी अशी सुमारे दाेनशे उद्याने आहेत. मात्र, या उद्यांनमध्ये देशी वृक्षाऐवजी सुशाेभीवंत वृक्ष लावण्यावर भऱ देण्यात आला आहे. देशी वनस्पतीच्या आधारित इतर जीवाचे जीवन चक्र व्यवस्थित चालते. यात छोटे किट‌कापासून, फुलपाखरे, मधमाश्या, छोटे प्राणी, पक्षी हे सर्व स्थानिक वनस्पतीवरच उपजीविका भागवतात. विदेशी वनस्पतीमुळे जैव विविधता धोक्यात आली आहे. तसेच शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांचा वापर, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणातही प्रचंड वाढ होत आहे.

Pune : पुण्यात उच्च शिक्षित तरुणांकडून गांजा विक्री; स्थापत्य अभियंतासह दोघांना अटक

दिवाळीमध्ये शहराचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नवीन बांधकामांवर आपण निर्बंध देखील घातले होते. त्यामुळे शहरवासीयांना स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजन मिळावा, यासाठी महापालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये आणि (PCMC) ज्या-ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाते त्या सर्व ठिकाणी शोभिवंत झाडे न लावता देशी झाडे लावावीत, अशी मागणी काळभाेर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.