Pune RTO : कंपन्यानो कॅबसाठी नव्या दराने आकारणी करा

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (Pune RTO) पुण्यातील कॅबसाठी जो दर ठरविला आहे, त्या दराची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा आदेश पुणे आरटीओ प्रशासनाने संबंधित कॅब कंपनीच्या प्रतिनिधींना दिला आहे. नवीन दराची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांनी थोड्या दिवसांची मुदत मागितली आहे.

पुण्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने एसी कॅबसाठी किमान दर ठरविला आहे. 1 जानेवारी पासून नवीन दराची अंमलबजावणी करण्याचे आदेशदेखील संबंधित कंपनीला दिले होते, मात्र पुण्यातील कोणत्याही कंपनीने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. दरम्यान 20 फेब्रुवारीपासून पुण्यात कॅब चालकांचा संप घेण्यावर ठाम असल्याचे इंडियन गिग वर्कर्सचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुण्यातील कॅबसाठी जो दर ठरविला आहे, त्या दराची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा आदेश पुणे आरटीओ प्रशासनाने संबंधित कॅब कंपनीच्या प्रतिनिधींना दिला आहे. नवीन दराची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांनी थोड्या दिवसांची मुदत मागितली आहे. दरम्यान, इंडियन गिग वर्कर्स फ्रंटने 20 फेब्रुवारीपासून ‘आरटीओ’समोर निदर्शने करून कॅब सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Chinchwad : चिंचवडमध्ये पार पडला ओतूर कॉलेज येथील 1990 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

पुण्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने एसी कॅबसाठी किमान दर ठरविला आहे. 1 जानेवारी पासून नवीन दराची अंमलबजावणी करण्याचे आदेशदेखील संबंधित कंपनीला दिले होते, मात्र पुण्यातील कोणत्याही कंपनीने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. दरम्यान 20 फेब्रुवारीपासून पुण्यात कॅब चालकांचा संप घेण्यावर ठाम असल्याचे इंडियन गिग वर्कर्सचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी (Pune RTO) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.