Mahavitaran : बांधकाम व्यावसायिकाला नवीन मीटर जोडणीसाठी लाच मागणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यावसायिकाला (Mahavitaran) नवीन मीटर जोडणीसाठी 24 हजार रुपायांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही कारवाई 6 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत घडली असून बुधवारी (दि.14) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाने केली आहे.

योगेश गोकुळ पाटील असे गुन्हा दाखल असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पुण्यातील सेनापती बापट रोड वरील महावितरण कार्यालयात तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना वास्तू नुतणीकरण करत असताना त्यांना 4 वीज मीटर कनेक्शन कमी पडत होते. यासाठी त्यांनी सेनापती बापट रोडवरील महावितरण कार्यालयात अर्ज केला होता.

Pune RTO : कंपन्यानो कॅबसाठी नव्या दराने आकारणी करा

यावेळी आरोपीने फिर्यादी (Mahavitaran) यांच्याकडे एका मीटर कनेक्शनसाठी 6 हजार अशी 24 हजार रुपयांची मागणी केलो होती. तपासात आरोपी यांनी ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक विद्यूलता चव्हाण पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.