Pune RTO : दुचाकीसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरु होतेय; दुचाकीचा मनपसंत क्रमांक चारचाकीसाठी राखून ठेवण्याची संधी

एमपीसी न्यूज – पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी (Pune RTO )नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. आपल्या दुचाकीचा क्रमांक चारचाकीसाठी राखून ठेवण्याची संधी पुणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना अर्ज करावे लागणार आहेत. तसेच तीनपट शुल्क देखील भरावे लागणार आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक(Pune RTO )चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह 21 मार्च रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) 22 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास 22 मार्च रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी 26 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.

Dighi : सोन्याचे दागिने चोरणाऱ्या शेजारणीला अटक

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज, चुकीच्या रकमेचा डीडी जोडलेले तसेच अचूक मोबाईल क्रमांक न लिहिलेले अर्ज बाद ठरविण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.