Alandi : सराईत गुन्हेगार अविनाश धनवेच्या हत्या प्रकरणातील एकास आळंदी मधून अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मधील सराईत गुन्हेगार अविनाश धनवे (Alandi )याचा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घृणपणे इंदापूर मधील एका हॉटेलमध्ये खून करण्यात आला. त्या खून प्रकरणात सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एका आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने आळंदी मधून अटक केली आहे.

राहुल संदीप चव्हाण असे आळंदी मधून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

इंदापुरातील हॉटेल जगदंब येथे अविनाश बाळु धनवे हा शनिवारी (दि. 16) त्याचे(Alandi )तीन मित्र नामे बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजू एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांच्या सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून चारही मित्र टेबलवर बसलेले असताना आठ जणांच्या टोळीने हातात पिस्तुल, कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याचा निर्घृणपणे खून केला. त्यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हॉटेल मधून पळून गेले.

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय 35, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, पुणे), मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय 20, रा. आंबेडकर चौक, पोलीस चौकी समोर, आळंदी देवाची ता. खेड पुणे), सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय 20, रा. शाळा नं. 4, चऱ्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची ता. खेड पुणे), सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय 22, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड पुणे) यांना अटक केली होती.

Khed: नफ्यातील 50 टक्के रक्कम मागत डॉक्टर महिलेचा विनयभंग

दरम्यान, आरोपी राहुल चव्हाण हा पसार झाला होता. तो आळंदी येथे त्याच्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन राहुल चव्हाण याला अटक केली. त्याला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली होती मोकाची कारवाई

सराईत गुन्हेगार अविनाश धनवे याने संघटीत गुन्हेगारी टोळी बनवली होती. त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून अनेक गुन्हे केल्याने अविनाश धनवे आणि त्याचे साथीदार ऋषिकेश गडकर, जगदीश काकडे यांच्यावर मे 2021 मध्ये मोकाची कारवाई करण्यात आली होती. धनवे आणि त्याच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांचे सतत दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी परिसरात वाद होत होते. त्यातूनही काही गुन्हे दाखल झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.