Chinchwad: सोशल मीडियावरील बनावट खात्याद्वारे महिलेची बदनामी
एमपीसी न्यूज – महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्याद्वारे महिलेची (Chinchwad)बदनामी केली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 18 मार्च 2024 या कालावधीत चिंचवड येथे घडला.
याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोशल मीडियावर (Chinchwad)बनावट खाते तयार करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC : शालेय साहित्यासाठी डीबीटी ऐवजी आता ‘क्यूआर’ कोड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती कोणत्यातरी मार्गाने चोरून त्या आधारे सोशल मीडिया साइटवर बनावट खाते तयार केले. त्या बनावट खात्यावरून फिर्यादी महिलेचे इतर व्यक्तींची प्रेम संबंध असल्याचे मेसेज करून फिर्यादी यांच्या नावाने अश्लील वस्तूंची ऑर्डर केली. फिर्यादीच्या पतीच्या मेल आयडीवर मेसेज केले. तसेच त्यांचा मेल आयडी विविध अश्लील साइटवर नोंदवला.
फिर्यादी यांचे इतर लोकांशी संबंध असल्याचे त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना मेसेज करून त्यांची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.