Pune : पुण्यात 18 टॅक्सी एग्रीगेटर कंपन्या बेकायदेशीर; आरटीओकडून संबंधित कंपन्यांना वेबसाईट आणि ॲप्स बंद करण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज – पुणे शहरात (Pune) सुमारे 18 टॅक्सी एग्रीगेटर कंपन्यांनी आरटीओची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आरटीओ कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या 18 टॅक्सी एग्रीगेटर कंपन्या पुणे शहरात बेकायदेशीरपणे सेवा देत आहेत. तसेच संबंधित कंपन्यांना त्यांच्या वेबसाईट आणि ॲप्स देखील बंद करण्याच्या सूचना आरटीओ कडून देण्यात आल्या आहेत.

या कंपन्या योग्य परवाना नसतानाही त्यांच्या वेबसाइट्स आणि ॲप्लिकेशन्सद्वारे कंपन्या त्यांचा व्यवसाय करत आहेत. टॅक्सी चालक युनियनच्या सततच्या मागणीनंतर आरटीओने या कंपन्यांच्या वेबसाइट्स आणि ॲप्स बंद करण्याचे आदेश काढले आहेत.

BJP : चिंचवडमध्ये भाजपच्या जाहिरातीला फासले काळे

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 93 (1) च्या तरतुदीनुसार या कंपन्यांना व्यवसाय करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. यापैकी एकाही कंपनीने परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज केलेला नाही. त्यामुळे सायबर सेलच्या विशेष महानिरीक्षकांनी अशा कंपन्यांच्या वेबसाइट बंद करण्याची कारवाई करण्याबाबत आरटीओला पत्र दिले आहे.

बेकायदेशीर कंपन्यांची यादी

MakeMyTrip, Goibibo, RedBus, Gozo Cab, Savari, InDrive, Rapido, Car Bazar, Taxi Bazar, Bla Bla Car, Cab-E, One Way Cab, Quick Ryde, S Ride, GaddiBoking by Kuldew, Taxi Wars, RouteMatic, Owner Taxi या कंपन्यांनी आरटीओकडे शहरात सेवा देण्याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आरटीओने या कंपन्यांना शहरात बेकायदेशीर घोषित केले आहे.

ओला, उबर या यादीत नाहीत (Pune)

ओला आणि उबरचा या यादीत समावेश नाही. कारण त्यांनी केंद्रीय एग्रीगेटर पॉलिसी अंतर्गत परवान्यासाठी यापूर्वीच अर्ज केला आहे. त्यांचा निर्णय प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) आगामी बैठकीत ओला, उबर बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पुणे आरटीओचे प्रभारी संजीव भोर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.