BJP : चिंचवडमध्ये भाजपच्या जाहिरातीला फासले काळे

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (BJP) भाजपने पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी प्रचारासाठी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. चिंचवड येथे एका ठिकाणी भाजपच्या जाहिरातीला काळे फासण्यात आले आहे.

शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार, अशी वाक्य लिहिलेला अन् पक्षाचे चिन्ह असलेल्या भिंती रंगविण्यात येत आहे. केशवनगर, चिंचवड येथील गणेश विसर्जन घाटाजवळ एका सोसायटीच्या भिंतीवर पक्षाचे चिन्ह असलेला मजकूर रंगविण्यात आला. मात्र कोणीतरी या जाहिरातीवर काळे फासले आहे. तसेच केशवनगर, चिंचवड येथील गोयल गरीमा या सोसायटी बाहेर रंगविण्यात आलेल्या भाजपच्या जाहिरातीवरील चिन्हावर महापुरूषाचा फोटो लावण्यात आला आहे.

Pune : एफसीआय गोदाम येथील तांत्रिक बिघाड दुरूस्त, ईव्हीएम यंत्र सुस्थितीत

दरम्यान, याप्रकरणी शहर भाजपच्या वतीने चिंचवड पोलीस ठाण्यात (BJP) तक्रार अर्ज दिला आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.