Dighi : सोन्याचे दागिने चोरणाऱ्या शेजारणीला अटक

एमपीसी न्यूज – शेजारी राहणाऱ्या महिलेने घराच्या उघड्या दरवाजा वाटे(Dighi) घरात प्रवेश करून घरातून एक लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात शेजारी महिलेला अटक केली आहे. 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Dighi)एका 38 वर्षीय महिलेने 9 ते 14 मार्च या कालावधीत त्यांच्या घरातील एक लाख 65 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

Talegaon Dabhade : वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या आठवणीला परिसंवादातून मिळाला उजाळा

या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास चालू केला असता फिर्यादी यांच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असल्याचे पोलिसांना समजले. पोलीसांना संशय आल्याने पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली. यावेळी तिने घरात कोणी नसताना उघड्या दरवाजा वाटे चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपी महिलेकडून 60 हजार रुपये किमतीचे मिनी गंठण आणि तीन तोळ्याचे मंगळसूत्र असा एकूण 1 लाख 65 हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक शिंगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक गुळवे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक पंडित पोलीस शिपाई कसबे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.