Lonikand : पुण्यातील लोणीकंद आणि हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची तडकाफडकी बदली

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणीकंद, हडपसर पोलिस (Lonikand) ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. लोणीकंद येथील झालेलं जळीतकांड आणि हडपसर मधील महिलेला मारहाण प्रकरण भोवलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोणीकंद येथील  दोन्ही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, लोणीकंद पोलिस ठाण्यांतर्गत वाघोली पोलिस चौकीत एका तरुणाने मंगळवारी स्वत: ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Pune : शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

दुसऱ्या बाजूला, हडपसर पोलिस ठाण्यात घरकाम करणाऱ्या एका महिलेला पोलिस कर्मचाऱ्यांकडून मारहाण (Lonikand) केल्याचा प्रकार घडला होता. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूरी केल्याचा ठपका ठेवला गेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.