Bhosari two wheeler theft : अवघ्या काही तासात दुकानासमोरुन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला दुकानासमोर (Bhosari two wheeler theft) पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 28) भोसरी येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी सव्वातीन या कालावधीत घडला.

अजित धनाजी माने (वय 19, रा. चिखली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon-Dabhade : जिल्हा मध्यवर्ती बँक शेती विकास सोसायट्यांच्या माध्यमातून खरेदी करणार इंद्रायणी भात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरी येथील पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानासमोर पार्क केली होती.(Bhosari two wheeler theft) सकाळी साडेनऊ ते दुपारी सव्वातीन वाजता च्या कालावधीत त्यांची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.