Diwali :  दुर्गम भागातील कातकरी समाजाची दिवाळी गोड

एमपीसी न्यूज – दिवाळी म्हणजे ( Diwali ) विद्युत रोशनाई, फटाक्यांची आतशबाजी ,उल्हास, उत्सव ,प्रेमाने भरलेला सण म्हणजे दिवाळी. पण आपल्या देशात 25 कोटी नागरीक दारिद्र रेषेखाली पाहाडी, दुर्गम भागात ,जंगलात रहात आहेत. त्यांना कसली दिवाळी? ते पोटाची खळगी भरण्यासाठी भटकत असतात. मानवी हक्क संरक्षण, जागृती व दिलासा संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागातील वाड्या, वस्त्यावर जाऊन टेम्पो भरून लोक सहभागातून जमा झालेले साहित्य कातवारी बांधवांना दिले.

ITI : शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज मागविण्यास मुदतवाढ

धान्य, कपडे, तेल, मिठाई, साखर,गुहू,ज्वरी पोहे यासह 15 वस्तूचे एक किट,  प्रत्येकी पैठणी साडी व तीन नवीन साडया, 600 पेक्षा जास्त साड्या व लहान मुलांचे ड्रेस त्यांच्या वाड्या वस्त्यावरील राऊतवाडी येथील कातकरी समाजाच्या कुटुंबाच्या घरी जाऊन देण्यात आले.

त्याठिकाणी 60 कुटुंबांची दिवाळी साजरी होईल एवढे साहित्य त्यांना दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुंज गावचे सरपंच सदाशिव शेंडगे होते. तर, प्रमुख पाहूणे म्हणून निवृत्त पोलीस आधिकारी मारुती मोहिते उपस्थित ( Diwali )  होते.

त्यानंतर चिंचवड येथील गुरूकुलम,विश्वनाथ वाघमोडे यांच्या अपंग विद्यालय निगडी या ठिकाणी देखील साहित्य दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच  दिवाळी झाल्याचे समाधान वाटले असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक म्हणाले की, 15 दिवस आम्ही घेतलेले परिश्रम व त्याचे चीज झाले. खूप आनंद झाला. खऱ्या गरीब गरजूवंतापर्यंत पोहोचल्याचे समाधान मिळाले. सर्व नागरिकांनीही आम्हाला सढळ हाताने मदत केली म्हणूनच शक्य झाले असे समाज उपयोगी उपक्रम यापुढे  आमच्या दोन्ही संस्था असे उपक्रम राबवतील.

महिला अध्यक्षा मीना करंजावणे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, गुणवंत कामगार भरत शिंदे, मा.पोलीस निरीक्षक मारुती मोहीते,सा.का.शंकर लगड, गजानन धाराशिवकर,विकास शहाणे, गणेश वाडेकर, राकेश वारेगावकर प्रकाश वीर,सा.का.गणेश रनवरे ,गुणवंत कामगार काळुराम लांडगे,मुरलीधर दळवी,शामराव सरकाळे,प्रताप देवडकर आदी ( Diwali ) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.