Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव(Talegaon Dabhade) भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. भेटकार्ड, कागदी कंदील, रांगोळी आणि गड किल्ले बनविण्यासारखे विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांनी दिवाळीचा उत्साह द्विगुणित केला.
तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. यावेळी इयत्ता पहिली ते दुसरीतील विद्यार्थ्यानी दीपावलीचे भेटकार्ड बनविले.
इयत्ता तिसरी – चौथीतील विद्यार्थ्यांनी दिवे बनविले. पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी  कागदांचे कंदील  तयार केले. नववी- दहावीतील  मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच नववी – दहावीतील मुलांनी मातीचे गड – किल्ले बनविले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उल्हास दिसत होता.

शाळेतली शिक्षकांनीही या दिवाळीच्या कृतिशील उपक्रमात सहभाग घेतला होता. सर्व शिक्षकांनी कागदाचे हार बनविले. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.
शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे,अध्यक्ष संदीप काकडे,खजिनदार गौरी काकडे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी सर्व विद्यार्थी व शाळेचे सर्व शिक्षक यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षकांना दिवाळीची भेटवस्तू देण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.