Pimpri : महापालिकेच्या शाळेत क्रीडाशिक्षकांची वानवा; 105 शाळांमध्ये केवळ ‘एवढे’ शिक्षक

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्याकडे (Pimpri) महापालिका प्रशासनाचा कल आहे. त्यासाठी डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. अभ्यासाव्यतिरिक्त काही विद्यार्थी क्रीडा निपुणदेखील आहेत. मात्र, एकीकडे शाळा डिजीटल होत असताना प्रशासनाचे क्रीडा विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या 105 शाळांमध्ये फक्त आठच क्रीडा शिक्षक आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पुरेसे क्रीडा साहित्य देखील उपलब्ध नाही.

विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि बौद्धीक विकास हा शाळेतच (Pimpri)घडत असतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असते. मात्र, महापालिकेच्या 22 शाळांना मैदान नाही. 17 शाळांची मैदाने छोटी असल्याने विद्यार्थ्यांनी खेळायचे कसे असा प्रश्न पडत आहे. शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यातील दोन ते चार तास खेळाचे असतात.

Alandi : डॉ.विश्वंभर चौधरी यांनी घेतले माऊलींच्या समधीचे दर्शन

यामध्येच विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांचा विकास होत असतो. विद्यार्थी कोणत्या खेळात निपुण आहे. हे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील अवस्थेतच कळण्यासा मदत होते. पण याच खेळण्या-बागडण्याच्या वयात क्रीडा शिक्षक आणि क्रीडा साहित्य नसल्याने विद्यार्थ्यांची खेळाविषयीची गरज आणि आवड कमी
होत आहे.

प्रत्येक शाळेच्या मैदानात विशिष्ट ठिकाणी खो-खो चे खांब आणि डबलबार असतात. विद्यार्थी शाळेच्या सुटीमध्येदेखील याठिकाणी खेळतात. मात्र, महापालिकेच्या शाळांमध्ये खो-खो चे खांब आणि डबलबार दिसत नाहीत. तसेच, क्रीडा साहित्यदेखील नसल्याने मुले सुट्टीत लपंडाव, पाठशिवणी खेळताना दिसतात. शाळांनी मैदानावर अ‍ॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यायची मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेत असतानाच चांगली क्रीडा मैदानेअसतील तर त्यांचा सरावही उत्तम होईल. महापालिकेने देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी शाळांना मैदाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. महापालिका विद्यार्थ्यांची खेळासाठी कुचंबणा होत आहे.

महापालिका शाळेत असलेल्या क्रीडाशिक्षकांना इतर कामे लावली जातात. तसेच,क्रीडाशिक्षक कमी असताना निवृत्तीनंतर रिक्त क्रीडाशिक्षकाचे पद भरले जात नाही. मुळात कला आणि क्रिडा हे सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. शिक्षकांची पद भरली जात नसल्याने क्रीडा विकासाला खीळ बसली आहे.

आमच्याकडील 15 क्रीडाशिक्षक 2010 पासून इलेक्शन ड्युटीवर आहेत. दोन महिन्यांपूर्वी आम्ही त्यांची मागणी केली आहे. मात्र, निवडणूक विभागाने त्यांना अजून त्या कामातून मुक्त केलेले नाही. या शिक्षकांऐवजी पर्यायी शिक्षक मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. ते लवकर मिळतील, अशी अपेक्षा आहेआणि मागेल त्या शाळांना 49 प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देऊ शकतो, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.