Pimpri : लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी प्रबोधनात्मक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (Pimpri)क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपाशेजारील जागेत करण्यात आले आहे.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील (Pimpri)क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस सकाळी 10.30 वाजता करून अभिवादन करण्यात येणार असून 11 वाजता चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11.15 वाजता पुतळ्याशेजारी शाहीर बापू पवार यांचा शाहिरी कार्यक्रम पार पडणार आहे.

RTO : दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका होणार सुरु; दुचाकीचाच नंबर चारचाकीसाठी हवा असेल तर अर्ज करा

शाहिरी कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारच्या(Pimpri) पर्वात 12.15 वाजता गायक लखन अडागळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम तर दुपारी 2 वाजता गायक निलेश देवकुळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दुपारच्या पर्वानंतर खास महिलांसाठी सायंकाळी 4 वाजता ‘न्यू होम मिनीस्टर- खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 6 वाजता गायक चंद्रकांत नगरकर यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी शहरवासीयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.