Pune Crime : भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune Crime) बीटी कवडे रोडवर सराफावर गोळीबार करून फरार झालेल्या दिल्लीतील सहा आरोपीना पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे. आरोपी हल्ला करून दिल्ली येथे पळून गेले होते. परंतु, पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली आहे. 

वानवडी पोलिस स्टेशनच्या पथकाने देशाच्या राजधानीतून तीन आरोपींना अटक केली. ज्यात शूटर बिलाल अहमद असदली त्यागी (वय 34), हनी वाल्मिकी (वय 26) आणि सागर राज कुमार (वय 23, सर्व दिल्लीचे रहिवासी) यांचा समावेश आहे. यापैकी त्यागीने सराफावर हल्ला गोळी झाडली होती.

सविस्तर माहिती अशी, की  मदनलाल ओसवाल (वय 71, रा. बीटी कवाडे रोड) आणि त्यांचा मुलगा प्रतीक ओसवाल (वय 35) यांचे हडपसर येथे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी परतत असताना बी.टी.कवडे रोडवरील जयसिंग ससाणे गार्डन जवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत रोख रक्कम दहा हजार आणि दोन तोळ्याचे दागिने हिसकवण्याच्या प्रयत्न दरोडेखोरांनी केला असता प्रतिक याने त्यांना विरोध केला.

यावेळी आरोपी त्यागी याने प्रतिकच्या दोन्ही पायावर आणि गालावर गावठी पिस्टलने गोळ्या झाडल्या. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत,

याप्रकरणी प्रतीकचे वडील मदनलाल ओसवाल यांनी एफआयआर दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात साजरी 

पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींवर कलम 34 (सामान्य हेतू), 341 (चुकीच्या प्रतिबंधासाठी शिक्षा) आणि 397 (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करून दरोडा किंवा डकैती) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

तपासादरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी बसवलेल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि हल्लेखोरांनी पळून (Pune Crime) जाण्यासाठी वापरलेला मार्ग तपासला. तपासानुसार हल्लेखोरांनी पुण्यात एक खोली भाड्याने घेतली होती. तपासाच्या आधारे, वानवडी पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील आरके पुरम परिसरातून तीन आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.