Nigdi : चोरट्यांनी पळवले डॉलर आणि युरो करन्सी

एमपीसी न्यूज – घरात ठेवलेले अमेरिकन डॉलर आणि युरो करन्सीसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी पाचच्या सुमारास आकुर्डी येथील दत्तवाडीमध्ये उघडकीस आली. 

संदीपराव पाटील (वय 36, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी पाटील यांच्या घराच्या दरवाजाची कडी खिडकीतून उघडली. घरातील कपाटात ठेवलेले 2100 अमेरिकन डॉलर आणि 250 युरो आदी विदेशी चलन तसेच दोन अॅपल आयपॅड, एक लॅपटॉप, घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. सकाळी उठल्यावर पाटील यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.