Prakash Amte : डॉ. प्रकाश आमटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Prakash Amte)   यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. आमटे हे. बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले होते.त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला.त्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

डॉ. आमटे आठ जून रोजी पुण्याच्या बी.जे.मेडिकल महाविद्यालयामध्ये दीक्षांत समारंभाला आले होते.त्यावेळी त्यांना जास्त ताप आणि खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार आणि तपासण्या सुरु आहेत व पुर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. सोमवारी उपचाराला थोडा प्रतिसाद मिळाला आहे.

Chandrakant Patil : विधान परिषद निवडणुकीतही भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील – चंद्रकांत पाटील

 

प्रकाश आमटे (Prakash Amte) लवकरच ठणठणीत बरे होतील यासाठी आपण प्रार्थना करुया. अधिक माहिती नितीन पवार देतील,असे अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टव्दारे कळविले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.