Pimpri News : चुकीला माफी नाही; ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत 139 जणांवर पिंपरी-चिंचवडमध्ये कारवाई

एमपीसी न्यूज : शहराच्या वेगवेगळ्या भागात ‘थर्टी फस्ट’ पूर्वी रात्री मद्यपान करुन वाहने चालविणाऱ्या 139 जणांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) कारवाई करण्यात आली. (Pimpri News) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नव वर्ष सुरु होण्यापूर्वी केलेल्या कारवाईत 3 दिवसात 139 मद्यपी चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्ताल्याच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड, देहू रोड, तळेगाव दाभाडे व चाकण अशी शहरे आहेत. तसेच हिंजवडी व तळवडे येथील आय टी पार्क आणि पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे, चाकण व इतर परिसरातील औद्योगिक क्षेत्र यांचा समावेश आहे. तसेच मावळ, मुळशी व खेड तालुक्यातील ग्रामीण भाग याचा ही समावेश आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला व त्या पूर्वी काही नागरिक मद्य पिऊन आनंद साजरा करतात. एवढ्यावरच न थांबता काही जण दारूच्या नशेत भरदाव वेगात वाहने चालवतात. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो व ते स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात त्यामुळे पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

Akurdi News : ज्येष्ठांनी डोळ्याची विशेष निगा राखावी – राजू मिसाळ

यासाठी पोलीस आयुक्ताल्याच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. संशयित वाहन चालकांना अडवून त्यांची तपासणी करण्यात येत होती.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगितले की, 29 डिसेंबर 2022 रोजी 35 वाहन चालकांवर मद्य पिऊन गाडी चालवल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात आली होती.(Pimpri News) 30 डिसेंबर 2022 रोजी 56 वाहन चालकांवर मद्य पिऊन गाडी चालवल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात आली होती. 31 डिसेंबर 2022 रोजी 48 वाहन चालकांवर मद्य पिऊन गाडी चालवल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात आली होती. तीन दिवसात एकूण 139 वाहन चालकांवर मद्य पिऊन गाडी चालवल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.