Akurdi News : ज्येष्ठांनी डोळ्याची विशेष निगा राखावी – राजू मिसाळ

एमपीसी न्यूज – बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण तर मोबाईल कॅप्यूटर व टीव्हीच्या अतिरेकामुळे डोळ्यावर ताण येतो. परिणामी नेत्र रोगाची समस्या वाढते.(Akurdi News) यासाठीच प्रत्येकाने विशेषतः ज्येष्ठांनी डोळ्याची निगा राखणे आवश्यक आहे, असे मत माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर व इखलास सय्यद मित्र परिवार यांचे वतीने आणि नेत्र तज्ञ  डॉ. नीलेश चाकणे यांच्या विशेष सहकार्याने  मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन  मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.  शिबिरात 72 रुग्णाची तपासणी करण्यात आली.

Chinchwad News : अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

शिबिराचे संयोजन प्रकाश परदेशी , शाहरुख शेख , यशवंत भालेराव , दीपक सावंत यांनी नियोजन केले. यावेळी अण्णा कुऱ्हाडे , ज्ञानेश्वर  ननावारे ,प्रवीण पवार  वसंत सोनार , (Akurdi News) गंगाधर चौधरी , बाळू तिरोडकर , जयसिंग पाटील मुन्ना खिलावन , चंद्रकांत इंगळे , गिरीश जोशी  , गोविंद राजेशिर्के दीपक तापकिर , दत्ता बोरहाड़े , संगीता पारेख इत्यादी उपस्थित होते. दर सोमवारी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इखलास सय्यद यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.