Chinchwad News : अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Chinchwad News) यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या प्राधिकरण, चिंचवड स्टेशन मंडलातील   कार्यकर्त्यांनी आज (सोमवारी) आंदोलन केले.

शाहूनगरमधील शिव शंभो मंदिरासमोर जाहीर निषेध केला. यावेळी माजी नगरसेवक केशव घोळवे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, सरचिटणीस नंदू भोगले, सूर्यकांत मोहिते, सुप्रिया  चांदगुडे, महिला मोर्चा अध्यक्षा दिपाली कारंजकर, जयश्री वाघमारे, नंदा करे, सुनिल वाट आणि मंडलातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Crime : सिंहगड कॅम्पस मध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्या म्होरक्याच्या बीड येथून आवळल्या मुसक्या

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. ते कधीच धर्मवीर नव्हते असे विधान केले होते. पवार यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपने निषेध आंदोलन केले.

संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास नकार देणा-या अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धरणवीर राजीनामा द्या, धरणवीर अजित पवार… (Chinchwad News) आम्ही छत्रपती संभाजी राजांना धर्मवीरच म्हणणार…अशा मजकुराचे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.