Pune Crime : सिंहगड कॅम्पस मध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्या म्होरक्याच्या बीड येथून आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज : सिंहगड महाविद्यालयाच्या आवारातील खाऊगल्लीत कोयता उगारुन दहशत माजविणाऱ्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली. गुंडाच्या साथीदाराला पोलिसांनी पाठलाग करुन त्याला चोप दिल्याची घटना नुकतीच घडली होती. (Pune Crime) या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करण्यात आले होते.

करण अर्जुन दळवी (वय 21 रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता)असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत अथर्व सुनिल लाडके (वय 20 रा. आंबेगाव बुदुक) याने फिर्याद दिली होती.

अथर्व 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सिंहगड महाविद्यालय परिसरातील खाऊ गल्लीत मित्रांबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी करण दळवी आणि त्याचा साथीदार सुजीत गायकवाड तेथे आले. दोघांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली. खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांचा काचा फोडल्या; तसेच या भागातील नागरिकांवर कोयते उगारुन दहशत माजविली होती.

Pune News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा आढावा

दळवी आणि गायकवाडने या भागातून जाणाऱ्या मोटारचालकावर कोयता उगारुन काच फाेडली होती. दहशतीमुळे या परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. नागरिक सैरावैरा पळत सुटले. त्या वेळी तेथे थांबलेला तक्रारदार अथर्व लाडके याच्यावर कोयत्याने वार केला. (Pune Crime) आरोपींनी अथर्वचा मित्र तन्मय ठोंबरे याला कोयता फेकून मारला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गस्त घालणारे पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि सहकाऱ्यांनी तेथे धाव घेतले. दोघांचा पाठलाग त्यांनी सुरू केला.

दळवीचा साथीदार गायकवाड पोलिसांच्या हाती लागला.पोलिसांनी गायकवाडला चोप दिला. या घटनेनंतर दळवी पसार झाला होता. तो बीडमध्ये लपल्याची माहिती पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला बीडमध्ये सापळा लावून ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, (Pune Crime) सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले आदींनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.