Talegaon : कला प्रतिभा प्रदर्शनाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद

एमपीसी न्यूज – एम आय टी जुनिअर कॉलेज येथे 15 व 16 ऑगस्टला कलाप्रतिभा प्रदर्शन पार पडले. यात सर्व वयोगटातील कलाकारांनी आपल्या कलाकृती सादर केल्या. चित्रप्रदर्शनासोबत नृत्य, गायन व वादन आदी कला समाविष्ट होत्या. ज्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Chinchwad : पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाययोजना करा – नाना काटे

प्रदर्शनाचा विषय भारत असा होता. प्रदर्शनाची मूळ संकल्पना अदिती बिचे व रविराज हरिप यांची होती. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे अदिती बिचे हिने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त 75 इंच X 75 इंच मोठ्या कॅनवास वर रेखाटलेले भारताचे चित्र.

भारताच्या 29 राज्यांतील शिल्प, मंदिर, धबधबे, पर्वत अशा 60 पेक्षा जास्त चित्रांतून भारताचे वैविध्यपूर्ण सौंदर्य यात अदितीने दाखवले. तर 16 तारखेला प्रदर्शनातील उत्कृष्ट कलाकृतींचा पारितोषक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

प्रदर्शनाला तळेगाव (Talegaon) तसेच पिंपरी-चिंचवड, लोणावळा येथून उदंड प्रतिसाद मिळाला. स्थानिक कलाकारांना कलेचे व्यासपीठ मिळावे या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे व असेच कार्यक्रम चालू ठेवण्याचा मानस आहे, असे आयोजक अदिती व रविराज ने सांगितले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निरंजन जहागीरदार,रूपक साने, सुचेता बिचे, दीपा हरीप यांनी विशेष सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.