Talegaon Dabhade : एमआयटी ज्युनिअर कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे साजरा

एमपीसी न्यूज – एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा स्पोर्ट्स डे मायमर मेडिकल ( Talegaon Dabhade ) कॉलेजच्या प्रांगणात उत्साहात साजरा झाला. 23 जानेवारी ते 25 जानेवारी या तीन दिवसांमध्ये विविध खेळातील नामांकित खेळाडूंनी हजेरी लावली.

यावेळी उद्घाटन प्रसंगी ॲड विनय दाभाडे, संतोष दाभाडे, ॲड. संतोष गराडे, किरण आरनके, हभप विद्यालयाचे प्राचार्य श्री के. चौधरी उपस्थित होते.

Pune : कीर्तने अँड पंडित संस्थेतर्फे ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन

या 3 दिवसांमध्ये विद्यालयाला वेगवेगळ्या शाळा कॉलेज मधून खेळाच्या शिक्षकांनी व त्यांच्या विद्यार्थ्यानी भेट दिली.या मध्ये राष्ट्रीय खेळाडू जुई जांभूळकर,राजू असवले, शुभम लोंढे तर शिव छत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी भेट दिली.सामाजिक क्षेत्रात काम करणारे इतर मान्यवरांनी भेट दिली.

कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र केसरी किशोर नखाते यांनी केली. विद्यालयाच्या पी. टी. शिक्षक वंदना केमसे,यशस्वी करिअर अकॅडमीचे अनिकेत उडाफे आणि प्राचार्य श्री के.चौधरी यांनी यासाठी विशेष परिश्रम ( Talegaon Dabhade ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.