Talegaon Dabhade : संविधान हे स्वातंत्र्याचे खरे प्रतीक – ॲड. नंदकुमार काळोखे

आदर्श विद्या मंदिर परिसरात प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज – 15ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झालेला असला तरी (Talegaon Dabhade) बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आणि घटना समितीच्या प्रयत्नातून साकार झालेले संविधान हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे प्रतिक असल्याचे मत मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. नंदकुमार काळोखे यांनी व्यक्त केले. 

मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे, सह सचिव प्रा. वसंत पवार, खजिनदार नंदकुमार शेलार, संस्थेचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.अनिकेत काळोखे,प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ,ज्यु. कॉलेजचे प्राचार्य संजय देवकर, आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संतोष खामकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिज्ञा मांडे,बालवाडी विभाग प्रमुख वैशाली इनामदार आणि बहुसंख्येने पालकवर्ग व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : एमआयटी ज्युनिअर कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे साजरा

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सहसचिव प्रा. वसंत पवार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी 16 वर्षापर्यंत मुलांना मराठीतून शिक्षण देणे गरजेचे असल्याचे सांगितले. निमशहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना पदवी पर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सुरू करण्यात आल्याचे सांगत यावर्षी महाविद्यालयाला नॅकची ‘बी ग्रेड’. मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयीन प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमाचे आभार संस्थेचे खजिनदार नंदकुमार शेलार यांनी मानले.आदर्श विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या कु.समृद्धी वांगसकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तिचा आणि तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शेलार यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक यश संपादन करून भारताच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन करत श्री शेलार यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा दंडगव्हाळ आणि प्रणव पवार यांनी (Talegaon Dabhade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.