Pune : कीर्तने अँड पंडित संस्थेतर्फे ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन

एमपीसी न्यूज – अमृतमहोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित एकात्मता व लोकशाहीचा ( Pune ) आनंदोत्सव साजरा करण्याकरिता कीर्तने अँड पंडित संस्थेच्या वतीने ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन 2024 चे आयोजन करण्यात आले. कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित संस्था, दशभुजा गणपती, करिष्मा सोसायटी चौक, कर्वे रोडने कर्वे पुतळा, शिवाजी महाराज चौक, कर्वे रोडने पुन्हा कीर्तने अँड पंडित या मार्गाने ही मॅरेथॉन झाली. तीन किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये संस्थेतील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंगमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्ष सीए अमृता कुलकर्णी, कीर्तने अँड पंडितचे सीए मिलिंद लिमये, सीए पराग पानसरे, सीए किशोर फडके, सीए प्रल्हाद मानधना आणि सीए सुहृद लेले आदी उपस्थित होते. सिद्धार्थ रावत, यश दाते आणि श्रवण बिश्नोई यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने, तर इतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले.

सीए मिलिंद लिमये म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही उत्सव साजरा करण्यासाठी व सर्वांमधील एकात्मता जपण्यासाठी ‘रन फॉर रिपब्लिक’ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. संस्थेतर्फे दरवर्षी आजच्या दिवशी सामाजिक उपक्रम आयोजित केला जातो. यापूर्वीही ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ ध्वज संकलन मोहीम, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.”

सीए राजेश अग्रवाल, सीए अमृता कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अनुजा कुलकर्णी व सहकाऱ्यांनी यशस्वी ( Pune ) संयोजन केले.

https://www.youtube.com/watch?v=YiCGH33SdwQ&t=12s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.