Vadgaon Maval : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याची किमया मावळ फेस्टीव्हलने साधली – मंत्री धनंजय मुंडे   

एमपीसी न्यूज – संस्कृतीचा वारसा जपत आपल्या मातीत उल्लेखनीय ( Vadgaon Maval ) कार्य करणाऱ्याच्या पाठीवर थाप टाकण्याचे काम मावळ फेस्टीव्हल वर्षानुवर्षे करतेय ही अभिमानास्पद बाब आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याची किमया मावळ फेस्टीव्हलने साधली असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात आयोजित केलेल्या मावळ फेस्टीव्हल सोहळ्याचे उद्घाटन कृषिमंत्री मुंडे यांच्या हस्ते व आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंगमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, पोटोबा देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश(आप्पा) ढोरे,पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव वायकर,मावळ विचार मंचचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर, मावळ भाजपा माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,अमोल बुचडे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, रोटरी सिटीचे विलास काळोखे, माजी नगरसेवक सुनील ढोरे, मुख्याधिकारी प्रवीण निकम, फेस्टिव्हलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, अध्यक्ष सुरेश जांभूळकर, कार्यक्रम प्रमुख विनायक भेगडे आदी उपस्थित होते.

कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून मावळच्या मातीशी माझे नाते आहे. आमच्या बीड जिल्ह्यातील अनेक लोक नोकरी निमित्ताने मावळात राहतात याचा मला अभिमान आहे. मावळच्या विकासात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे योगदान आहे असाही उल्लेख करत आमदार शेळके यांच्या माध्यमातून अजित पवारांनी मावळसाठी भरभरून निधी दिल्याचे सांगितले.

आमदार शेळके म्हणाले की, वडगाव शहर क्रीडा व सांस्कृतिक भूमी म्हणून ओळखले जाते. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे काम करणे आवश्यक आहे आणि हे फक्त मावळ फेस्टिवलच्या मंचावर दिसते. याप्रसंगी श्रीराम कला नाट्य मंडळ, पवळेवाडी यांना जीवनगौरव, श्री एकवीरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट सामुदायिक विवाह सोहळा समितीला सामाजिक व बैलगाडा शर्यतीत नावलौकिक मिळवलेल्या रामनाथ वारींगे यांच्या ‘ओम्या’ बैलाला विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात ( Vadgaon Maval )  आला. यानंतर ‘करून गेलो गाव’ हे विनोदी नाटक संपन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.