Pune : पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे महापालिकेमध्ये आंदोलन

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या (Pune) पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले.

भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल नाईक यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Moshi : प्रस्तावित कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागेचा शोध!

यावेळी धीरज घाटे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे. या मागणीसाठी आजपर्यंत प्रशासनासोबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.

त्यामुळे आज आम्ही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या (Pune) कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.