Moshi : प्रस्तावित कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागेचा शोध!

एमपीसी न्यूज – मोशी येथील सिल्व्हर-9 सोसायटीलगत (Moshi) प्रस्तावित कचरा संकलन केंद्राला पर्यायी जागेसाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार, तीन जागेंची पाहणी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आपल्या सिल्वर-9 सोसायटी जवळ नियोजित कचरा संकलन आणि वितरण केंद्र सुरू करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. यापार्श्वभूमीवर चिखली-मोशी- चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता.

दरम्यान, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांची सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यानुसार आमदार लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘‘लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र नकोच..’’ अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नियोजित कचरा कचरा संकलन आणि वितरण केंद्र हलवण्यासाठी इतर ठिकाणी जागेचा पर्याय देण्याबाबत सांगितले होते.

यावर आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत सोसायटी (Moshi) फेडरेशनचे पदाधिकारी, आमदार लांडगे यांच्या कार्यालयातील प्रतिनिधी यांच्या समवेत तीन जागांची पाहणी करण्यात आली आहे. यापैकी एका ठिकाणी कचरा संकलन केंद्र स्थलांतरीत करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यावर आयुक्त शेखर सिंह काय निर्णय घेतात? याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Khopoli Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू तर सहा प्रवासी जखमी

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मागणीनुसार, आज आम्ही प्रस्तावित कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागा दाखवली आहे. या जागेचा प्रस्ताव या पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कचरा संकलन केंद्राचे स्थालांतर पर्यायी जागेत करण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या हिताचा विचार करावा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका कायम राहणार असल्याचे चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.