Chinchwad : शिवतेजनगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – चिंचवड शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्यदिव्य नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Moshi : प्रस्तावित कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागेचा शोध!

प्रतिष्ठानच्या वतीने 6 फुट उंचीची नागप्रतिमा तयार केली असून जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पुजा करावी असा संदेश देण्यात आला आहे. या ठिकाणी महिलांसाठी उंच झोका बांधण्यात आला असून, झोका फुगडी, उखाणे व इतर पारंपरिक पद्धतीने खेळाचे नियोजन करण्यात आले आहे. नागप्रतिमेचे पुजन तारा बहिरवाडे, अंजली देव, सारिका रिकामे, क्षमा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने अनेक पारंपारिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन महिला मंडळाच्या अंजली देव ,सारिका रिकामे ,क्षमा काळे, नीलिमा भंगाळे, श्रद्धा बहिरवाडे, गीता पाटील, प्रीती झोपे ,मीरा बिरादार ,स्नेहल खडके सविता राणे, दिपाली योगी, छाया सातपुते ,मोहिनी शिराळकर, अश्विनी केवळकर ,मनीषा भडंगे, नेहा अहिरे व मंगल काळे यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.