Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत अंबिका काळोखे प्रथम

एमपीसी न्यूज – जिल्हा स्तरीय रायफल शूटिंग (Talegaon Dabhade) स्पर्धेच्या पीक साईड एअर रायफल प्रकारात 17 वर्ष वयोगटात एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या अंबिका काळोखे हिने प्रथम क्रमांक पटकावला. 400 पैकी 395 गुण मिळवून ती जिल्ह्यात प्रथम आली असून या विजयामुळे तिची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. त्याचबरोबर एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.

दरवर्षी जिल्हा क्रीडा कार्यालय तर्फे तालुका आणि (Talegaon Dabhade)जिल्हास्तरावरील विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षी सुद्धा या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये एम आय टी जुनियर कॉलेज तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.

Pimpri : मराठा समाजाचे पिंपरीत साखळी उपोषण

 

अंबिका काळोखे हिने 17वर्ष वयोगटातील पीक साईड एअर रायफल शूटिंग प्रकारात 400 पैकी 395 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येऊन विभागासाठी तिची निवड झाली. 200 मीटर धावणे प्रकारात अभय साळुंखे द्वितीय, तर 100 मीटर धावणे प्रकारात यश चव्हाण तृतीय तसेच सांघिक खेळामध्ये फुटबॉल जिल्ह्यात द्वितीय, कबड्डी तालुकास्तरीय तृतीय क्रमांक, वॉलीबॉल तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे.

क्रीडा शिक्षिका वंदना केमसे यांनी विध्यार्त्यांकडून कसून तयारी करून घेतली परिणामतः विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सरस कामगिरी केली.पुन्हा एकदा एम आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासाचे नव्हे तर खेळामध्येही यशाची परंपरा कायम राखली.एम आय टी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विनोद साळवे आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.