Hinjawadi : व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून घरगुती गॅस सिंलेडरमध्ये गॅस भरत असल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कोणत्याही परवानगीशिवाय व्यावसायिक गॅस (Hinjawadi) मधून घरगुती गॅस सिलेंडरमध्ये भरत असल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हि घटना सोमवारी (दि.23) म्हाळुंगे, हिंजवडी येथे घडली आहे.

याप्रकर्णी पोलीस हवालदार तुषार आशोक शेटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अविनाश दत्तात्रय माने (वय 23 रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी (Hinjawadi) शिवाय व्यावसायीक गॅस सिलेंडर मधून घरगुती गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरत होता.

Wakad : 14 लाख रुपयांची लूटमार करणाऱ्या सराईतासह चार आरोपींना अटक, वाकड पोलिसांची कामगिरी

यावेळी लोकाच्या जिवीतास धोका होईल हे माहिती असतानादेखील आरोपी हा बेकायदेशीर कृत्य करत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.