Pimpri : मराठा समाजाचे पिंपरीत साखळी उपोषण

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी (Pimpri) जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातही मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत.

आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारने 40 दिवसात मराठा समाजास (Pimpri) आरक्षण दिले नाही. मराठा समाजाची फसवणूक केली. याचा निषेध करण्यासाठी व मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य करावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

Talegaon Dabhade : मंत्रालयात कामाला असल्याचे सांगून, योजनेतील कर्जाच्या बहाण्याने 4 लाख रुपयांची फसवणूक

या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्या यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साखळी उपोषणास सुरू करण्यात आले आहे.

या साखळी उपोषणास मराठा समाज बांधवांनी व इतर समाजाच्या संघटनांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला. मानव कांबळे,सचिन चिखले,मारुती भापकर,प्रकाश जाधव,अजिज शेख,अॅड.वंदना जाधव,अॅड.लक्ष्मण रानवडे,काशिनाथ जगताप,सतिश चांदेरे धनाजी येळकर,राजन नायर यांनी मनोगते व्यक्त केले.

सतीश काळे,वैभव जाधव,लहू लांडगे,मिराताई कदम,नकुल भोईर,अभिषेक म्हसे,प्रतिभा भालेकर,ज्योती जाधव,उमेश जमदाडे,गणेश जाधव यांच्यासह अनेक बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. शोभा जगताप,सुनिता शिंदे,स्मिता म्हसकर,रवींद्र चव्हाण,दिलीप काकडे,अलका भालेकर,दिपक मोहिते,निलेश भदाले,संतोष शिंदे,अशोक सातपुते,देवराम कोठारे,जयराम नानेकर,सुवर्णा कुडपणे,कंचन काळोखे,यांच्यासह अनेक महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.