Talegaon Dabhade : मंत्रालयात कामाला असल्याचे सांगून, योजनेतील कर्जाच्या बहाण्याने 4 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मंत्रालयात कामाला असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (Talegaon Dabhade) कार्यक्रम (सीएमईजीपी) अंतर्गत क्रज मिळवून देतो म्हणून महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हि घटना 8 मे 2023 ते आजपर्यंत तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राजेश चव्हाण व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्यात भव्य पॉटरी फेस्टिव्हलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व त्यांच्या (Talegaon Dabhade) नातेवाईकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक कोटींचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले,.तसेच मंत्रालयात कामाला असून मुलीला नोकरी लावून देतो असे ही आमीष दाखवले. यासाठी वेळीवेळी फिर्यययादी यांच्याकडून 4 लाख 3 हजार 240 रुपये घेतले. मत्र आज अखेर कोणतेही कर्ज न देता, मुलीच्या नोकरी बाबात विचारणा केली असता उडावीउडवीची उत्तरे आरोपी फिर्यादीला देत आहे.आरोपीने फोन बंद केला.

यावेळी त्य़ांच्याबाबात माहिती काढली सता ते मंत्रालयात नोकरीला नसल्याचेही समोर आले. या फसवणूकीवरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.