Pune : पुण्यात भव्य पॉटरी फेस्टिव्हलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : मातीपासून बनविलेल्या कलात्मक वस्तू, दागिने, (Pune) शिल्पे, भित्तीचित्रे यांसोबतच मातकाम करणाऱ्या कलाकारांशी संवाद साधत ही कला जवळून अनुभविण्याची संधी पुणेकरांना अनुभविता येणार आहे. निमित्त आहे पुण्यातील इंद्रनील गरई यांच्या आयजीए गॅलेरियाच्या वतीने आणि भूमी पॉटरी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या पुण्यातील ‘मेगा पॉटर्स फेस्टिव्हल’चे.

या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून येत्या शुक्रवार दि. 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन या ठिकाणी सकाळी 11 ते रात्री 9 दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

Pimpri : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरशालेय भजन स्पर्धेचे आयोजन

याबद्दल अधिक माहिती देताना इंद्रनील गरई म्हणाले, “देशातील (Pune) महत्त्वाचा महोत्सव म्हणून हा पुणे पॉटर्स मार्केट ओळखले जाते. महोत्सवाच्या या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होत असलेल 24 पॉटर्स हे विशेष आकर्षण असणार असून यामध्ये प्रामुख्याने स्टुडीओ पॉटर्स आणि आपल्या कलेला हाताने मूर्त रूप देणारे कलाकार यांचा सहभाग असेल.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या, वापरात येणाऱ्या मातीच्या वस्तू, सिरॅमिकमध्ये बनविलेली शिल्पे, भित्तिचित्रे, दागिने आणि विशेष कलाकृती यांचा सहभाग महोत्सवात असेल. यामध्ये पुण्यासोबतच मुंबई, रायगड, मेहसाना, बंगळूरू, गोवा, कलकत्ता, अहमदनगर या भागातील कलाकार सहभागी होणार आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.