Pimpri : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरशालेय भजन स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ अंतर्गत सुरु केलेले स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (Pimpri) व मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय पुरुष व महिला आणि आंतरशालेय भजन स्पर्धा दिनांक 28 ते 30 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सदर आंतरशालेय भजन स्पर्धेसाठी (15 वर्षाखालील, संपर्क क्रमांक : 9022816058 द्वारे) नाव नोंदणी करणे अनिवार्य राहणार असून  तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी महिला गटासाठी  (9604613402), पुरुष गटासाठी (9689918989)  नाव नोंदणी करणे दिनांक 25 ऑक्टोंबर अखेर करणे अनिवार्य राहणार आहे.

आंतरशालेय भजन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आणि सहभागी संघास सन्मानचिन्ह व त्यामधील प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड (Pimpri) जुनिअर कॉलेज, पाटीलनगर, टाळगांव चिखली येथे आयोजित करण्यात आली आहे.

Charholi : चऱ्होलीतील पॅराडाइस इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसरा व नवरात्र उत्सव साजरा

28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अजित पवार – उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री पुणे जिल्हा तर विशेष अतिथी दिलीप वळसे पाटील – मंत्री सहकार, महाराष्ट्र राज्य, चंद्रकांत दादा पाटील – मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, वस्रोउद्योग, संसदीय कार्ये, महाराष्ट्र राज्य, डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती विधानपरिषद या उपस्थित राहणार आहेत.

तर कार्यक्रमाचे उद्घाटन शेखर सिंह (भा.प्र.से) आयुक्त तथा प्रशासक तथा अध्यक्ष संतपीठ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

यावेळी लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे,सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, संग्राम थोपटे विधानसभा सदस्या उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप विधानपरिषद सदस्य अण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच सदानंद मोरे – अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ तथा संचालक संतपीठ, अभय टिळक – माजी विश्वस्त आळंदी देवस्थान तथा संचालक संतपीठ संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी – विजयकुमार थोरात व सचिव – संजय नाईकडे, तसेच संतपीठ संचालक – चंद्रकांत इंदलकर, प्रवीण जैन, संदीप खोत, तानाजी शिंदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संतपीठाचे संचालक डॉ.स्वाती मुळे व राजूमहाराज ढोरे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.