Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात 24 ठिकाणी झाडे पडली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 16) सायंकाळी वादळ (Chinchwad) आले. यामध्ये 24 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे वाहने आणि घरांचे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे वादळी वारे (Chinchwad) वाहू लागले. यामुळे शहरात झाडे बऱ्याच ठिकाणी पडली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडे 24 झाडे पडल्याच्या घटनांची नोंद आहे. शहरात मंगळवारी सायंकाळी आग लागल्याची व ऑइल गळती झाल्याची नोंद आहे.

Iran-Israel conflict : इस्रायल-इराण तणावामुळे भारतावर आर्थिक परिणाम होऊ शकतात

 

या वादळामुळे अनेक ठिकाणी घरांवर व  रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांवर  झाडे पडल्यामुळे घरांचे व  वाहनांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे पडलेल्या ठिकाणी धाव घेत घरांवर व रस्त्यावर पडलेली झाडे तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.