Today’s Horoscope 17 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 17 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 17.04.2024 .

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – श्रीराम नवमी.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.
—————————–
मेष ( शुभ रंग- पिस्ता)

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. काही जण सहकुटुंब प्रवासाला निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील वाणीत मात्र गोडवा ठेवा.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन (शुभ रंग – मोतिया)

आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणीत मृदुता ठेवली तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र आज त्रास होईल.

कर्क ( शुभ रंग- मोरपंखी)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. सर्व कामे सुरळीत पार पडतील. उपवारांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक आज माघार घेतील.

सिंह ( शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षितपणे दूर चे प्रवास घडू शकतात.

कन्या (शुभ रंग- आकाशी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)

उच्च अधिकारी वर्गाला अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)

आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

धनु (शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूर राहा आज झटपट लाभाचा मोह टाळा संयम ठेवा.

मकर (शुभ रंग- पांढरा)

कौटुंबिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा तुम्ही उमटवू शकाल. काही पेच प्रसंगांना समर्थपणे तोंड द्याल. व्यस्त दिवस.

कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येऊ शकतात. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मीन (शुभ रंग- निळा)

कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी तुम्ही वेळ व पैसाही खर्च करू शकाल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.