Iran-Israel conflict : इस्रायल-इराण तणावामुळे भारतावर आर्थिक परिणाम होऊ शकतात

एमपीसी न्यूज – इराण आणि इस्रायल मधील तणावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य पूर्व क्षेत्रात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इराण आणि इस्रायल देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा ,भूराजकीय आणि आर्थिक हितसंबंध धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरीयामधील इराणच्या दुतावासावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने दि.(15 एप्रिल)  पासून हल्ले चढविले आहेत. या  दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताचे आर्थिक हित धोक्यात  येऊ शकते. मागील काही वर्षांपासून भारताने इराणबरोबर आर्थिक भागीदारी वाढविली असून विशेषत: चाबहार बंदरसारख्या प्रकल्पामध्ये बऱ्यापैकी आर्थिक गुंतवणूक केली आहे.

भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांबरोबर चांगले संबंध आहेत. भारताची इस्रायलशी तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारी वाढलेली आहे तर इराणबरोबर पायाभूत सुविधा, गुंतवणूक, तांदूळ, औषधे, यंत्रसामुग्री आणि दागिन्यांची देवाणघेवाण होत असते. जर इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये तणाव कायम राहिल्यास भारताच्या आर्थिक हितसंबंधावर भयंकर परिणाम (Iran-Israel conflict) होईल असे भाकीत आर्थिक विश्लेषकांनी केले आहे.

मध्यपूर्व आखाती देशांत 90 लाखांहून अधिक भारतीय राहतात. यापैकी, 10 हजार लोक इराणमध्ये आणि 18 हजार लोक इस्रायलमध्ये राहतात. या सर्व लोकांची सुरक्षा निश्चित करणे ही  भारत सरकारची सध्याच्या या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे प्राथमिकता असू शकते.

मागील पन्नास वर्षांपासून इस्रायल आणि आखाती देशांमध्ये राजकीय, धार्मिक आणि आर्थिक हितसंबंध विकोपाला गेले आहेत. इस्रायलने 1948 ते 1973 दरम्यान इजिप्त, सीरिया आणि जॉर्डनसह अरब शेजारी राष्ट्रांशी चार मोठी युद्धे केली  तसेच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची निर्मिती झाल्यापासून इस्रायलला इतर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. त्यात लेबनॉनमधील हिजबुल्ला, पॅलेस्टिनी प्रदेशातील हमास आणि येमेनमधील हुथी यांचाही समावेश होता.

इराण आणि इस्रायलमधील तणाव लवकर निवळला नाही तर भारताला नव्हे तर जगाला इंधन दरवाढीचा फटका बसू शकतो करण जागतिक इंधन वाहतुकीमध्ये  20% इंधन वाहतूक  इराणमधून होते. भारतासहित अनेक देशांचे राजकीय विश्लेषक यांच्या म्हणण्यानुसार या दोन देशांतील  तणाव लवकर निवळला पाहिजे अन्यथा संपूर्ण जगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागेल.

Inflation : डाळींच्या किमतीत मोठी वाढ, डाळींच्या वाढत्या दरांवर सरकार ठेवणार नियंत्रण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.