Charholi : चऱ्होलीतील पॅराडाइस इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसरा व नवरात्र उत्सव साजरा

एमपीसी न्यूज : पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्र उत्सव (Charholi) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा पूजनाने झाली. रावण दहन, नवदुर्गा पूजन, दांडिया, मुले, पालक, शिक्षक यांच्या गीतगायनाने सादर केलेला भोंडला हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. यावेळी मुलांना रावण दहण व दसऱ्याचे व विजयादशमीचे महत्व अधिवक्ता सचिन काळे यांनी सांगितले.

ते म्हणाले की भारतीय संस्कृती शौर्य व परिक्रमाची उपासक आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, या काळात देवीच्या दाही दिशा आदिशक्तीने भारवलेल्या असतात.

याच काळात वाईट गोष्टीचा अंत झालेला असतो, महिषासुराला ठार (Charholi) केले, रावणाचा वध केला, मराठ्यांनी युद्धभूमीला सुरुवात केली, पांडवांचा आज्ञातवास संपला, विराटच्या काही गायी पाळणाऱ्यानी कौरव सैन्यावर स्वारी केली, आणि यामुळेच दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

खंडनवमी निमित्त मुलांनी पाठयपुस्तकांचे पुजन करून वेगवेगळ्या वेषभूषा करत पालकांची मने जिंकली. लहान मुले राम,सिता,हनुमान यांच्या वेषभूषा धारण केल्याने त्याचे विशेष आर्कषण होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड म्हणाले की, भारतासह 5 देशात 51 आदिशक्ती पिठे आहेत, तर महाराष्ट्रात रेणुका माता, तुळजाभवानी माता, अंबाबाई माता, सप्तशृंगी माता ही ठिकाणे आहेत. आपण नेहमीच विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती दिली पाहिजे असे मत व्यक्त केले.

Pune : २६ ऑक्टोबर रोजी ‘जनहित याचिका’ व संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन

हा उत्सव संस्थेचे अध्यक्ष अँड अनंत काळे, संचालक नवनाथ काळे, व अँड सचिन काळे सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

 

क्रीडा शिक्षक संदेश साकोरे, समन्वयीका सपना शिंपी ,कलाशिक्षक अभिषेक हजारगे, संगणक शिक्षिका भाग्यश्री फिरके सहभाग नोंदवला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती भामरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.