Pune : २६ ऑक्टोबर रोजी ‘जनहित याचिका’ व संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या (Pune)वतीने गुरुवार,26 ऑक्टोबर रोजी पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभ्यास वर्गामध्ये ‘जनहित याचिका ‘ या विषयावर (Pune)राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे मार्गदर्शन करणार आहेत.

Maratha Reservation : सरकारला दिलेली वेळ संपली; मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणावर!

हा अभ्यास वर्ग 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता गांधी भवन, कोथरूड येथे होईल. अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य असणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.