Pimpri : एकनाथ पवार यांचा ठाकरे गटात प्रवेश

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpri) माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुबंईत मातोश्रीवर जात त्यांनी हाती शिवबंधन बांधले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.

Charholi : चऱ्होलीतील पॅराडाइस इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसरा व नवरात्र उत्सव साजरा

शिंदे-फडणवीस-पवार सरकार मराठा समाजाला (Pimpri) आरक्षण देण्यात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत दोन दिवसांपूर्वी पवार यांनी भाजपला रामराम केला होता. पवार हे ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता होती. झाले तसेच, पवार यांनी आज जन्मदिनी समर्थकांसह मुंबईला जात ठाकरे गटात प्रवेश केला. पवार यांना भोसरीतून निवडणूक लढविण्याची संधी नव्हती.

त्यामुळे नांदेडमधील लोहा कंधारमधून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. लोह्यात ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद असल्याने पवार यांनी प्रवेश केल्याची चर्चा आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.