Pune : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते”, खून झालेल्या दर्शना पवारचे शेवटचे भाषण

एमपीसी न्यूज : दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या 26 वर्षे तरुणीचा खून झालाय. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. दर्शना ही तिसऱ्या क्रमांकाने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. मात्र मित्रासोबत ती ट्रेकिंग साठी गेली होती आणि परत आलीच नाही. दरम्यान याच दर्शनाच्या भाषणाचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

Pune : तडीपार काळातही शहरात फिरणाऱ्या सराईताला बेड्या

दर्शनाचे वनविभागाच्या परीक्षेत सिलेक्शन झाल्यानंतर पुण्यात (Pune) तिचा स्पॉटलाईन अकॅडमी मध्ये सत्कार करण्यात आला. या सत्कार नंतर तिने एक भाषण केलं होतं. त्याचाच व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओत बोलत असताना दर्शना म्हणते की, प्रत्येकाच्या लाईफ ची एक स्टोरी असते.

परंतु ती स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी सक्सेस भरून आपल्याकडे येते. आपण शाळा महाविद्यालयात चांगला परफॉर्मन्स करतोय. पण आज एवढे सत्कार होत आहेत, अनेक लोक आपल्याशी येऊन बोलतात, ते आपल्या मुलींना घेऊन येतात आणि विचारतात की सांगा अभ्यास कसा केला पाहिजे. आपण एखादी गोष्ट साधी केलेली असते तेव्हा त्यात अनेक लोकांचा हात असतो. मात्र आपण जेव्हा अपयशी ठरतो तो दोष आपला असतो. यासोबतच दर्शना आपल्या भाषणात खूप काही बोलून गेली.

 

दरम्यान दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचा मित्र राहुल हंडोरे अद्यापही बेपत्ता आहे. दर्शना पुण्यात सत्कार झाल्यानंतर 12 जून रोजी राहुल सोबत राजगड किल्ल्याच्या परिसरात ट्रेकिंग साठी गेली होती. दोघेही दुचाकीवरून त्या ठिकाणी गेले होते. मात्र त्यानंतर दर्शनाचा मृतदेह सापडला. ही घटना घडली तेव्हापासून राहुल हंडोरे बेपत्ता आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.