Pune : तडीपार काळातही शहरात फिरणाऱ्या सराईताला बेड्या

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहरातून तडीपार करण्यात आलेले असताना देखील पुर्वपरवानगी न घेता शहरात वेगवेगळया ठिकाणी फिरणार्‍याला कोंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याला लुल्लानगर चौकातून अटक करण्यात आली आहे. जयेश सुनिल भंडारी (वय २२, रा. मंहमदवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pune : ‘त्या’ 6 पोलीस ठाण्यांवर क्राईम ब्रँचचा वॉच; तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे आदेश

जयेश भंडारी याला वानवडी पोलिसांकडून पुणे शहरातुन एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे तडपारी आरोपी आणि रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत होते. त्यावेळी जयेश हा लुल्लानगर चौकात उभा असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार, माहितीची खातरजमा करण्यात आली.

 

त्यानंतर पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या भागात सापळा रचुन त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता शहरात येण्यासाठी त्याने पोलीस उपायुक्त अथवा न्यायालयाची परवानगी घेतली आहे काय याची विचारणा केली असता त्याने कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आली. त्यामुळे त्याच्याविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.