Pune : ‘त्या’ 6 पोलीस ठाण्यांवर क्राईम ब्रँचचा वॉच; तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज : सहकारनगर आणि वारजे परिसरात झालेल्या वाहनांच्या तोडफोडीची पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार घडण्याची शक्यता आहे अशा पोलीस ठाण्यांवर आता क्राईम ब्रँच विशेष लक्ष असणार आहे.

Ncp : माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्‍या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घेण्याचे जे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरे जाणे तुमचं – माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे – शरद पवार

त्यानंतर गुन्हे शाखेने ही तत्काळ आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. एका रात्रीत गुन्हे शाखेने परिसर पिंजून काढत तब्बल अडीचशे गुन्हेगारांची तपासणी केली असू,न त्यांना हजरेली बोलविले आहे. पंधरा दिवस ही मोहिम सुरू राहणार आहे.

 

पुणे (Pune ) शहरातील वारजे, सहकारनगर, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, स्वारगेट आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहिम सुरू केली आहे. क्राईम ब्राँचचे पोलीस रात्रभर परिसर पिंजून काढत तेथील गुन्हेगारांवर दहशत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. गुन्हे शाखेची पथके येथील वॉन्टेड, रेकॉर्डवरील आरोपी पकडणे तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक करत आहेत. तर, यातून सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करून आवश्यक अशा गुन्हेगारांवर एमपीडीए तसेच तडीपारीची आणि मोक्काची कारवाई सुरू केली आहे.

 

गेल्या एक वर्षांपासून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार असणाऱ्या पापुल्या वाघमारेने चांगलाच गोंधळ घालत वारजेत तीन तरुणांवर वार केले. त्यानंतर येथील वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर याच टोळीने सहकारनगर येथील ३५ ते ४० वाहनांची देखील तोडफोड केली.

 

त्यामुळे पुण्यात (Pune) गुन्हेगारांचेच राज्य सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. मागील काही महिन्यांत पुण्यात थंडावलेल्या गुन्हेगारीने पुन्हा डोकेवर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.