Katraj Firing: क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून कात्रज परिसरात गोळीबार

एमपीसी न्यूज – क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात भांडण झाले. दुसऱ्या दिवशी भांडण मिटवण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. मात्र यावेळी भांडण मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखी कडाक्याचे भांडण झाले. आणि त्यानंतर झालेल्या वादावादीतून एकाने पिस्टल काढून थेट गोळीबार केला. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत (Katraj Firing) बुधवारी रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला. सुदैवाने पिस्टल मधून सुटलेली गोळी कुणाला लागली नाही. मात्र त्यानंतर झालेल्या पळापळीत दोघेजण किरकोळ जखमी झाले. 

प्राथमिक माहितीनुसार, कात्रज परिसरात (Katraj Firing) राहणाऱ्या तरुणांच्या दोन गटांमध्ये मंगळवारी क्रिकेटची मॅच झाली. मात्र क्रिकेट खेळत असताना या दोन्ही गटात भांडण झाले. हे भांडण मिटवण्यासाठी आज दोन्ही गट पुन्हा एकत्र आले.

Pune : काँग्रेसमध्ये आता केवळ 3 जण प्रबळ दावेदार 

यावेळी त्यांच्यात एक सराईत गुन्हेगार देखील होता. मात्र या दरम्यान भांडण मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखी भांडण झाले. एका तरुणाने थेट गावठी कट्टा काढून एका सराईत गुन्हेगारावर ताणला. मात्र अन्य एका तरुणाने धक्का दिल्याने बंदुकीतून झाडलेली गोळी त्याला लागली नाही. आणि त्यानंतर या दोन्ही गटात पळापळ झाली. त्या घटनेत दोन तरुण किरकोळ जखमी झाले.

दरम्यान गोळीबार (Katraj Firing) झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली.

आरोपी आणि फिर्यादींची माहिती घेत काही जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण घटनेची माहिती सध्या पोलीस घेत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.