Pune : काँग्रेसमध्ये आता केवळ 3 जण प्रबळ दावेदार 

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असताना ( Pune) काँग्रेसचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. त्याउलट भाजपने मराठा उमेदवार देऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये 20 जण इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आता केवळ 3 जण प्रबळ दावेदार आहेत. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांचा समावेश आहे.

काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते मंडळी आता कामाला लागली आहे. त्यामुळे 20 जणांची इच्छुकांची यादी आता कमी करून शहर पातळीवर तीन नावे निश्चित केली आहेत. या तीन उमेदवारांपैकी कोणालाही उमेदवारी द्या, अशी भूमिका शहरातील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे इतर मागासवर्गाला (ओबीसी) संधी मिळणार की अनुभवी उमेदवाराला, याबाबतचा तिढा सोडविण्यासाठी आता प्रदेश पातळीवर निर्णय सोपविण्यात आला आहे.

Maval : कामगारांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू; आरोपी अटकेत

भाजपाने मराठा उमेदवार दिला असल्याने काँग्रेसकडून ओबीसी उमेदवार देण्याबाबत ( Pune) चाचणी सुरू आहे. तीन नावांपैकी धंगेकर आणि बागुल हे दोघेही ओबीसी प्रवर्गातील आहेत. धंगेकर हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे पुणेकरांच्या चांगल्याच परिचयाचे झाले आहेत. त्यांचा कसब्यातील करिष्मा शहरात लागू होण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसकडून त्यांच्या नावाला पसंती देण्यात येत आहे.

मात्र, त्यांच्यापेक्षा माजी आमदार मोहन जोशी यांचा निवडणुकांचा अनुभव दांडगा आहे. यापूर्वी त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत जोशी यांना दोन लाख 13 हजार मते मिळाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जोशी यांना तीन लाख मतदारांनी मते दिली होती.

त्यामुळे अनुभवाला संधी मिळणार की लोकप्रियतेला, याबाबतचा निर्णय आता काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर घेतला जाणार आहे. बागुल यांनी पुणे महापालिकेतर्फे विविध प्रकल्प त्यांच्या प्रभागात सुरू केले आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. महापालिकेत गटनेते असताना त्यांनी भाजपच्या कारभारावर वचक ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचाही उमेदवारीसाठी विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली  ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.