Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये टेक्निकल फेस्टिवल संपन्न

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रतिभाना चालना देण्यासाठी (Talegaon Dabhade)व विविध कौशल्यगुण विकसित करण्यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी येथे ‘टेक फिएस्टा 2024’ नुकताच पार पडला. शाश्वत विकासाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प या फेस्टिवल मध्ये सादर केले. यात सुमारे 1200 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आयसरचे जेष्ठ वैज्ञानिक डॉ.अरविंद नातू,(Talegaon Dabhade)निताल कॉम्प्युटर सिस्टीम लिमिटेडचे सुदर्शन नातू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.राज्यमंत्री संजय (बाळा ) भेगडे,सचिव संतोष खांडगे,संस्थेचे खजिनदार तसेच कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के,विश्वस्त महेश  शहा,चंद्रकांत शेटे,कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई,अभियांत्रिकीचे सीईओ रामचंद्र जहागीरदार,प्राचार्य डॉ. विलास देवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune: अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली रद्द करा – माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘टेक फिएस्टा 2024’ अंतर्गत प्रकल्प स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या 35 पेक्षा अधिक संघांच्या सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच प्रथम ते अंतिम वर्षात शिकणाऱ्या सुमारे 1200 हुन अधिक विध्यार्थ्यानी विविध तांत्रिक स्पर्धामध्ये भाग घेतला. परिसरातील विविध औद्योगिक समूहांनी उत्स्फूर्तपणे या तांत्रिक महोत्सवाचे प्रयोजन केले.
या स्पर्धेमध्ये ‘सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी स्मार्टसिटी,सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण, प्रदूषण विरहित इंधनाचा वापर असे प्रकल्प सादर केले. याप्रसंगी ‘ फास्टनर्स, पाईप्स आणि थ्री डी प्रिंटेड मॉडेल्सचे’ चे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा.स्पंदन वाघमारे, डॉ. कुंदन मिश्रा,डॉ.रोहिणी हनचाटे,प्रा.सुषमा भोसले,प्रा.विवेक नागरगोजे आदी प्राध्यापकांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.