Today’s Horoscope 21 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 21 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 21.03.2024.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेला असेल.

आज नक्षत्र – आश्लेषा 25.27 पर्यंत नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क 25.27 पर्यंत नंतर सिंह.
—————————–
मेष- ( शुभ रंग- आकाशी)
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांशी उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृह सौख्याचा दिवस.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासचे प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

मिथुन (शुभ रंग – निळा)
धन स्थानातील चंद्रभ्रमण आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.

कर्क ( शुभ रंग- जांभळा)
आज खिशात पैसा खेळता राहील. तुमची मनस्थिती ही उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द तुम्ही आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल.

सिंह ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभाने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

कन्या (शुभ रंग- पिस्ता)
आज हार्ड वर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल असेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी काही खर्चही कराल.

तूळ (शुभ रंग- राखाडी)
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

धनु (शुभरंग- जांभळा)
जे चाललंय ते बरच म्हणायला हवं. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. आज सासुरवाडीकडून एखाद्या लाभ होऊ शकतो.

मकर (शुभ रंग- भगवा )
वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल.

कुंभ ( शुभरंग- मरून)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल.

मीन (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.