Extortion case : माल पोहचवण्यासाठी मागीतली 29 लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  – कंपनीतील माल पोहोच करण्यासाठी 29 लाख 54 हजारांची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 जुलै ते 17 ऑक्टोबर या कालावधीत खराबवाडी येथील एका कंपनीत घडली.

गणेश शंकरराव कदम (वय 39, रा. मोशी) यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राउंड क्लॉक कंपनीचे मालक प्रशांत आनंद शेटे, प्रोजेक्ट मॅनेजर सॅमुवेलजबराज राजूनाडार व कंपनीचे इतर पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीतून एअरविंड नावाचा माल भरलेले तीन कंटेनर खराबवाडी येथून चेक प्रजासत्ताक येथे पोहोच करण्यासाठी आरोपींनी 17 लाख 94  हजार 452 रुपयांचे कोटेशन दिले. फिर्यादींकडून दोन कोटी 33  लाख 21 हजार 120 रुपयांचा माल भरलेले तीन कंटेनर आरोपींनी ताब्यात घेतले. त्यांनतर 47 लाख 48 हजार 760 रुपयांची मागणी केली. ठरलेल्या रकमेपेक्षा 29 लाख 54 हजार 308 रुपये जास्त पैशांची मागणी केली. ही रक्कम दिली नाही तर ते फिर्यादींचा माल असणारे कंटेनर पोर्टमधून फिर्यादींच्या गिऱ्हाईकापर्यंत पोहोच करणार नाही, अशी धमकी दिली. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.